भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

महाराष्ट्रातील एकमेव गाव “आनंदाच्या शिधा ” पासुन वंचित, रावेर तालुक्यात रेशन वितरण व्यवस्थेत महाघोटाळा

रावेर, ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,वृत्तसेवा। जळगांव जिल्हयातील रावेर तालुक्यात असलेल्या बलवाडी तालुका रावेर येथील रेशन दुकानात मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे.राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी राज्यातील गोरगरीब जनतेची दिवाळी साजरी व्हावी म्हणुन राज्यातील सर्व कार्ड धारक यांना आनंदाचा शिधा किट वाटप करण्याची घोषणा करून या किट मध्ये रवा, चना डाळ,साखर, व पामतेल याप्रमाणे राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिवाळी किटचे वाटप केलेलें आहे
परंतु वाटप करताना हे किट ऑनलाईन पद्धतीने वाटप करतांना सर्व्हर डाऊन झाल्याने वाटप हे ऑनलाईन होत नसल्याने मुख्यमंत्री यांनी राज्याचे पुरवठा सचिव यांना आनंदाचा शिधा वाटप हे ऑफलाईन पद्धतीने वाटप करण्यासाठी दुकानदार यांना आदेश करावे असे आदेश करण्याचे आवाहन केले, त्यानुसार संपुर्ण महाराष्ट्रात राज्यात दुकानदार यांनी झाले तर ऑनलाईन व नाही झाले तर ऑफलाईन वाटप केले.


परंतु राज्यात एकमेव गाव ते म्हणजेच जळगांव जिल्हयातील रावेर तालुक्यातील बलवाडी गावात शासकिय धान्य गोदामातून हे किट म्हणजेच रवा, चनाडाळ, साखर व पामतेल असे सर्व बलवाडी गावांतील दुकानदार यांना दिवाळीतच वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात आलेले असुन सुध्दा तसेच एक महिना कालावधी होऊन सुध्दा हे किट दुकानदार यांनी वाटप केलेले नाही. लाभधारकाना दिवाळीचा आंनदाचा शिधा किट पासून वंचित ठेवल्याने याबाबत येथिल सरपंच, विनायक पाटील, व दक्षता समितीचे सदस्य तसेच गावांतील तमाम कार्डधारक यांनी मुख्यमंत्री, उपुख्यमंत्री, तसेच पुरवठा मंत्री, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना ऑनलाईन व ऑफलाईन तक्रार केल्याने रावेर तालुका तहसीलदार देवगुने मॅडम व रावेर पुरवठा निरीक्षक डी.के.पाटिल यांनी बलवाडी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून दुकानाचा स्टॉक हा पंचाचे समक्ष तपासणी केली असता गोदामातून प्राप्त झालेले आनंदाचा शिधा किट जसेच्या तसेच स्टॉक मध्ये आढळून आले आहे, याबाबची अधिक चौकशी करण्यात आली असता गावातील कार्ड धारक यांचे पुरवठा अधिकारी यांनी लेखी जाब जबाब घेतले असून पंचनामा केला आहे.

आनंदाचा शिधा किट दिवाळी होऊन महिना उलटूनही मिळालेले नसल्याने कार्ड धारक यांनी जबाब नोंदवून दिला आहे.
किटचे वाटप हे मुख्यमंत्री यांनी ऑफलाईन पद्धतीने वाटप करण्याची मुभा दिली असताना एक महिन्याचा कालावधी संपूनही वाटप का करण्यात आले नाही? कार्ड धारक यांना शासकिय योजनांचा लाभपासुन का वंचित ठेवले?
याबाबत त्या दुकानदार यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी अशी सर्वत्र मागणी होत आहे.

बलवाडी येथील रेशन दुकानाची पहाणी केली असता दिवाळीत वाटपासाठी शासनाने दिलेला आंनदाचा शिधा किट लाभार्थ्यांना वाटप केलेला नसून जसाचा तसाच स्टाक आढळून आला ,त्याचा पंचनामा केला असून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल.
उषाराणी देवगुणे
तहसीलदार, रावेर, जि. जळगाव

दिवाळीच्या सणासुदीत दिवाळी निमित्त गरीब कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप हे महाराष्ट्र शासनाकडून बंधन कारक असुन सुध्दा दुकानदार यांनी अद्याप वाटप केलेलें नाही यावरून दुकानदार यांनी शासनाची फसवणूक करून आनंदाचा शिधा किट गोलमाल करण्याच्या हेतूने व शासनाच्या योजना पासून वंचित ठेवल्याने सदर रेशन दुकान चालकावर कारवाई करण्यात यावी असे ग्रा. पं. च्या वतीने शासनाने तक्रार केली आहे.संजय वाघ माजी सरपंच, बलवाडी, तालुका रावेर

शासनाकडून मिळालेल्या आनंदाचा शिधा गावातील दुकानदार यांना दिवाळीतच प्राप्त झालेला असून सुध्दा व एक महिन्याचा कालावधी होऊन सुध्दा दुकानदार यांनी कार्ड धारक यांना वंचित ठेवल्याने व किट वाटप दिवाळीच्या आधीच झाले पाहिजे होते मात्र अद्याप ही वाटप झालेले नाही त्यामुळे सदर रेशन दुकान चालकावर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी शासनाकडे रीतसर मागणी केलेली आहे. — विद्यमान सरपंच विनायक पाटील, बलवाडी, ता.रावेर

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!