भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

तासखेडा येथे जि.प.शाळेच्या पटांगणावर अज्ञातांनी बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा

तासखेडा.ता.रावेर. मंडे टू मंडे न्युज,अनिल इंगळे। रावेर तालुक्यातील तासखेडा येथिल जि.प. शाळेच्या पटांगणावर रात्री काही अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती आकाराचा पुतळा बसविला.सकाळी गावातील नागरिकांना याची चाहुल लागताच सर्व गावामध्ये ही वार्ता वाऱ्या सारखी पसरली असता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बघ्यांची गर्दी होवू लागली. घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती गावातील पोलीस पाटील लिलाधर पाटील यांनी सावदा पोलीस स्टेशनला फोन वरून माहीती देताच सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक डि.डि. इंगोले आपल्या कर्मचाऱ्यां सोबत घटना स्थळी दाखल होताच जमलेला जमाव पांगवण्यात आला.

सदरिल पुतळ्याची पोलिसांनी पाहणी केल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखिल याची माहीती देण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशानुसार सावदा पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक इंगोले यांनी गावातील जेष्ठ नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, सदस्य तसेच गावातील नागरिकां सोबत चर्चा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पुजाविधी करून पुतळ्याला हलवून शाळेच्या खोलीमध्ये ठेवण्यात आले. हा घटना क्रम चालू असतांनाच त्या ठिकाणी रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे ह्या देखिल हजर झाल्या त्यांनी सुद्धा घडलेल्या संपूर्ण प्रकाराची पाहणी केली शाळेला असलेल्या अपूर्ण कंपाउड मुळे प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त केला. काही वेळ थांबल्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तहसीलदार आपल्या सोबत घेवून गेल्या . सदरिल घटनेचा गावामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गावामध्ये संपूर्ण शांतता प्रस्तापित आहे. घटनेच्या ठिकाणी माजीआमदार राजाराम गणू महाजन,भाजपा चे शिवाजी पाटील, राहुल कांबळे. ग्रामसेवक गाते. शरद पाटील. तलाठी सावदा . तासखेडा पोलीस पाटील, सरपंच, सदस्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!