ऐनपुर येथील जल जिवन मिशनचे बंद पडलेले काम अखेर सुरु
ऐनपुर,ता.रावेर.मंडे टू मंडे न्युज, विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐनपुर येथेल जल जीवन मिशनचे काम अचानक काम बंद पडले होते त्यामुळे नागरिक संभ्रमात पडले असा आशयेचे वृत्त दि. २३ मार्च रोजी “मंडे टू मंडे न्युज ” ने बातमी प्रसिद्ध केली होती त्याची दखल घेऊन अखेर काम सुरु करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम सुरु झाले होते पंरतु काम अचानक पणे बंद पडले होते जल जीवन मिशन ही योजना भारत सरकारची मुख्य योजना आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे आहे परंतु हे काम बंद पडले होते परंतु त्यामुळे नागरिकांना पाणी मिळेल नही हे काम सुरू होईल की नाही असा संभ्रमात गावातील नागरीकास पडले होते हे काम का बंद पडले केव्हा सुरू होईल की नाही असी उलट सुलट चर्चा गावत सुरु होती परंतु मंडे टू मंडे न्युज मध्ये “ऐनपुर येथे जल जीवन मिशन चे काम बंद, नागरीक पडले संभ्रमात” आशा आशायचे वृत्त प्रकाशित करून होणाऱ्या सभाव्य नुकसानीची बाब लक्षात आणुन दिली होती याची शासन प्रशासनाने दखल घेत कामाला सुरुवात केली आहे यामुळे ऐनपूर गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे यामुळे नागरिक आनंद व्यक्त करत आहे