तांदलवाडीत इन्व्हर्टर बॅटरीची चोरी,चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या टन काटयाच्या कार्यालयातून शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी इन्व्हर्टर आणि बॅटरीची चोरी केली.गेल्या दोन दिवसांपूर्वी विवरा येथे एकाच रात्री तब्बल सहा ठिकाणी चोरी केली होती
तांदलवाडी येथील सावदा रोडवरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या टन काटयाच्या कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने शनिवारी रात्री दरवाज्याचा कडी कोंडा तोडून प्रवेश केला.तेथील कपाट व इतर साहित्याची तोडफोड केली काहीच हाती न लागल्याने त्यांनी तेथील सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या वायर कापल्या व इन्व्हरटर आणि बॅटरीची चोरी करून पसार झालेत.रविवारी सकाळी हि घटना उघडकीस आली.सी सी टी व्ही फुटेज तपासून चोरटयांचा शोध घेणार असल्याच्या प्रयत्नात निंभोरा पोलिस असून निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील गाव परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने रात्रीच्या वेळेस नागरिकांनी सतर्क राहून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान निंभोरा पोलिस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.