तापी परिसरात अवैध दारू धंद्यांचा महापुर, उत्पादन शुल्क विभाग हप्ते घेत असल्याचा निघतोय सुर
सावदा,ता.रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील तापी परिसर म्हणुन ओळख असलेल्या उदळी , तासखेडा, रायपुर परिसरात दारुचे अवैध धंदे अधिकाधिक वाढत असुन याचा परिणाम परिसरासह गावातील तरुण पिढी वर होतांना दिसत आहे. कारण तापी परिसर हा शेतकरी तसेच मोलमजुरी करणाऱ्या लोकांचा असुन या ठिकाणी रसायनयुक्त दारु बनवली जाते. व हीच दारु पन्नी मध्ये बांधुन स्वस्त दरात विकली जाते.
मात्र या स्वस्त दारुच्या नांदाला लागून बऱ्याचशा तरुण युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काहींचे परिवार हे उघड्यावर येवून बसली आहे तर काही परीवारांना उपासमारी सहन करावी लागत आहे. आणि या सर्व बाबींना कारणीभूत आहे तर ती हातभट्टी दारू होय. यामुळे दारुड्या व्यक्तींचे आरोग्यतर धोक्यात आहेच त्याच बरोबर त्यांच्या परिवाराचे सुद्धा चहो बाजूनी नुकसान होत आहे. यात भरडला जात आहे तर व्यसनाधीन व्यक्ती सह त्याचा परिवार व मौज मस्तीत आहे तर तो अवैध व्यवसायीक .
मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे जाणून बुजून आर्थिक लोभा पोटी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. कारण ज्या ठिकाणी हे जिवघेणे रसायनयुक्त दारुचे कारखाने चालवले जात आहे त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी येतात खरे मात्र कुठली कारवाई करण्या कामी नव्हे तर अवैध दारूचा कारखाना सुरु ठेवण्यासाठी ठरलेल्या हप्त्याची रक्कम घेण्यासाठी.
दर दिवसाला अवैध दारुचे धंदे कमि न होता अधिकाधिक वाढत असल्याने यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा खुला आर्शिवाद समजायचे की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अश्या अवैध धंद्याबाबत ओरड केल्यास छोट्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो मात्र मोठ मोठी कारखाने चालवणाऱ्यांना पठिशी घालत असल्याचे बोलले जात आहे. जिल्हाभरात चालत असलेल्या दारुबंदीच्या मोहीमेमध्ये तापी परिसरावर संबधित विभाग मेहरबान असल्याचे चित्र दिसत आहे. कारण आजही मोठ्या थाटात अवैध व्यवसायीक आपला व्यवसाय चालवत आहे. यावर होणार? संबंधित विभाग यावर काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरेल.