भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर शहरात एकाच रात्री तब्बल सात ठिकाणी चोऱ्या, तहसीलदारांचे घरही फोडले

रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर शहरात एकाच रात्री तब्बल सात ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या.रावेर शहरातील जुना सावदा रोड वरील तहसीलदार यांच्या घरासह जीआय कॉलनी व रेल्वे स्टेशनजवळ या चोऱ्या झाल्या आहेत. शहरात एकाच रात्री चोरीच्या सात घटना घडल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

रविवारी रात्री शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. ही संधी साधून जुना सावदा रोडवरील येथील तहसीलदार बी ए कापसे यांच्या जुना सावदा रोडवरील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. तसेच जीआय कॉलनी परिसरात प्रत्येकी तीन ठिकाणी तर रेल्वे स्टेशनजवळ एका ठिकाणी अशा सात ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. जुना सावदा रोडवरील माऊली नगरात येथील तहसीलदार बी ए कापसे हे राहतात. सलग तीन दिवस सुट्या असल्याने घराला कुलूप लावून श्री कापसे बाहेर गावी गेल्याची संधी साधून चोरटयांनी रविवारी रात्री त्यांचे घर फोडले.

येथील स्टेशनवरील भागात असलेले राशन दुकान फोडून ५ गव्हाचे तर ६ तांदळाचे कट्टे असा एकूण १२,२०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. पोलिसांनी या घटनेत संशयित म्हणून दोघांना ताब्यत घेतले, दुकानात काम करणाऱ्या मापड्यानेच चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, तसेच जीआय कॉलनीत झालेल्या चोरीत मोठा ऐवज चोरीला गेल्याची माहिती मिळत आहे. ठसेतज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग, एपीआय आशिषकुमार अडसूळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!