तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी अत्याचारातून सात महिन्यांची गर्भवती
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी जबरदस्तीने शारीरीक संबंध केल्याने अत्याचारातून ७ महिन्यांची गर्भवती राहिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.
पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी तरुणाने साधारण सात महिन्यांपूर्वी पिडीता घरी एकटी असतांना तीच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच यानंतर कोणास काही सांगीतले तर जिवे मारण्याची व बदनामी करण्याची धमकी देत संधी साधून दोन ते तीन वेळा जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. पिडीतेने भीतीपोटी कोणास काहीएक सांगीतले नव्हते.
त्यानंतर पीडिता ही तीच्या भाऊ सोबत ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेली होती. यानंतर १५ दिवसापूर्वी गावी परत आल्यावर पिडीतेचा पोटाचा आकार वाढत असल्याने तिला तीचे नातेवाईक सामान्य रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून पीडिता ७ महीन्याची गर्भवती असल्याचे सांगीतले. याप्रकरणी संशयित आरोपी तरूणा विरुद्ध रावेर पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप निरी. दिपाली पाटील या करीत आहेत.