रावेर येथील तीन गुन्हेगारांना सहा महिन्यांकरिता जिल्हा बंदी
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर येथील तिघांना पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सहा महिन्यासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.त्यात जावेद शेख लुकमान,वय २७, सादिक शेख लुकमान,वय २३, सदाम शेख लुकमान,वय २० सर्व रा. हत्तेहनगर, पाण्याचे टाकी जवळ, रावेर,असे तिघांचे नावे आहे.
रावेर पो.स्टे. कडील हद्दपार प्रस्ताव क्र. ६/ २०२२ प्रमाणे जावेद शेख लुकमान (वय २७), सादिक शेख लुकमान (वय २३), सदाम शेख लुकमान (वय २० सर्व रा. हत्तेहनगर, पाण्याचे टाकी जवळ रावेर) यांच्या विरुध्द रावेर पो.स्टे.ला (१) गु.र.नं. ६७ / २०२२ भादंवि क. १६०.११२, ११७ प्रमाणे. (२) गु.र.नं. ९०/ २०२१ भादंवि क. १६०, १८८, २६९, ११२, ११७ प्रमाणे, (३) गु.र.नं.४३/२०२२ भादंवि क. १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हे दाखल आहे. सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. तिघां गुन्हेगारांनी टोळीने राहून रावेर शहरात दहशत पसरवितात. त्यामुळे रावेर शहरात व शहराच्या लागून गावांत सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यांना रावेर शहरात शांतता ठेवण्याबाबत त्यांच्याविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे तिघांच्या वर्तनात सुधारणा व्हावी याकरीता पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सामनेवाला ६ महिन्या करीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतून हद्दपार केलेले आहे. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.