सावदा येथील सोमेश्वर नगर मध्ये किंग कोब्रा चा थरार
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा।। रावेर तालुक्यातील सावदा येथील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या सोमेश्वर नगर कॉलनीमध्ये शनिवार दिनांक सहा रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास किंग कोब्रा सदृश्य सापाने थरार माजविला होता सदरील साफ हा अत्यंत देखणा आणि चपळ असा असल्यामुळे पूर्ण काॅलनी वासियांची दातखिळ बसलेली होती.
सायंकाळी सात वाजता चिनावल येथील मूळ रहिवाशी असलेल्या सावदा येथे सोमेश्वर नगर मध्ये नुकतेच घर बांधलेल्या चौधरी कुटुंबीय हे आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते तर त्यांचे शेजारी वासुदेव बेंडाळे यांच्या परिवारातील लोक फिरत असताना त्यांना अचानक चौधरी यांच्या वट्यावर काहीतरी काडीसारखं पडलेलं दिसलं त्यांनी रोखून बघितला असता तो एक भला मोठा काळाशार आणि कोब्रा जातीचा सर्प असल्याचे लक्षात आले आणि त्यानंतर सुरू झाला थरार . दोघं महिलांनी जोरात आरोळ्या मारून काॅलनी वासियांना गोळा केले आणि त्यास पकडण्यासाठी धावपळ सुरु झाली..त्यात श्रावण महिन्यात् साक्षात महादेवाच्या सर्पाने दर्शन देण्यासाठी आले असेही यावेळी बघ्यांमधून म्हटले जात होते. आणि ओम नमः शिवाय चा जाप देखिल या वेळी सुरू झाला.
घटना अनुभव बघून लहान मोठे सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला आणि धास्तीही तितकिच अनुभवास मिळाली . येणारा जाणारा प्रत्येक जण थांबून या सर्पाचे दर्शन करीत होता कुंडली मारून दोन फूट उंच फनी काढून बसलेल्या सर्पाचे दर्शन शेकडो लोकांनी घेतले आणि त्याच्या भयंकर फूतकाराने पूर्ण कॉलनी मध्ये आवाज होत होता अशा या भयंकर सर्पाला पकडण्यात फेजपूर येथील सर्पमित्र निरज नंदाने यांनी कामगिरी बजावली आणि सुखरूप पणे त्याला बॉटलमध्ये पकडून नेले मात्र श्रावण सोमवार महिन्यांमध्ये सर्पाचे दर्शन झाल्याने सोमेश्वर कॉलनी वासीय सुखावले आणि धास्तावले सुद्धा असा हा दुहेरी प्रसंगाचा सर्वांना अनुभव झाला.