गरजूंना मोबाईल वाटप! सावद्यात ताई फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महिलांनी बचत गटात सहभागी व्हावे व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन उमेद अभियान जळगाव जिल्हा व्यवस्थापक हरेश्वर भोई यांनी सावदा येथे झालेल्या ताई फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या गरीब, गरजू व दिव्यांग बांधवाना मोबाईल वाटपाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते.
तसेच समाधान रतन पाटील, जिल्हा संसाधन व्यक्ती, पंतप्रधमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग,जळगाव यांनी पंतप्रधमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याविषयी माहिती देत मार्गदर्शन केले. भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील जयश्री तायडे (शेळीच्या दुधा पासून साबण निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक) यांनी आपले अनुभव सांगितले. मुक्ताईनगर चांगदेव येथील आदर्श शिक्षक विश्वनाथ महाजन यांनी महिलांनी चूल व मूल सांभाळत असतांना आता आत्मनिर्भर व्हावे व स्वतःचे पायावर उभे राहणे आवश्यक असल्याचे संगितले.यावेळी पत्रकार प्रवीण पाटील, मंडे टू मंडे चे संपादक भानुदास भारंबे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात ताई फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक सपकाळे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब, गरजू, विधवा व दिव्यांग यांची सेवा करताना समाधान लाभते यात कोणताही हेतू न बाळगता निस्पृह कार्य करणे हाच संस्थेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते गरीब, विधवा, गरजू महिलांना १०० मोबाईल वाटप करण्यात आले,
यावेळी विश्वनाथ महाजन, पत्रकार शाम पाटील, प्रवीण पाटील, भानुदास भारंबे,कैलास लवंगडे, दिपक श्रावगे, लाला कोष्टी, विकी भंगाळे,आदी उपस्थित होते. यावेळी आशिष जोशी, साई सपकाळे, संतोष बेदरकर, महेश बेदरकर, जितेंद्र बाविस्कर, सतीश पाटील, सागर चौधरी, कृष्णा संगेले, करिश्मा संगेले आदी ताई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.