भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर मध्ये गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील दोन जणांना विनापरवाना गावठी कट्टा व जिवंत काळतुसे बाळगल्या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी केलेल्या झाडाझळतीत सोमवारी पहाटे अटक करण्यात आली असून यातील एक युवक नकली नोट प्रकरणाशी संबधित असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी, शहर पोलिसांकडून सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास झाडाजडती घेत असतांना येथील कुंभार वाड्यातील रहिवासी महेंद्र अर्जुन प्रजापती (वय-२५) याच्या घरातून २० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे आढळून आले. ही कारवाई सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली.यातील दुसरा आरोपी रवींद्र राजाराम प्रजापती याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. कॉन्स्टेबल पाटील यांच्या फिर्यादीवरून आर्म ऍक्ट ३/२५ भादंवि कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इस्माईल शेख करत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!