रावेर शौचालय घोटाळा : आणखी दोघ आजी माजी अधिकारी अटकेत
रावेर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : रावेर पंचायत समितीच्या (Raver Panchayat Samiti) स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वयक्तिक शौचालय घोटाळा प्रकरणात प्रभारी सहायक गटविकास आधिकारी आणि सेवानिवृत्त विस्तार अधिकार्यांना अटक करण्यात आल्याने आजी माजी अधिकाऱ्यांपर्यंत अटकेची कारवाई पोहचली असल्याने आणखी काही जणांवर कारवाईची शक्यता आहे.
- ग्रामपंचायतींवर “महिलाराज” यावल तालुक्यात ३२ महिला “सरपंच” पदावर विराजमान होणार
- “मुक्ताई भवानी अभयारण्यात” नर बिबट्याचा मृत्यू
- रावेर तालुक्यातील चिनावल, निंभोरा, मस्कावद, ऐनपूर सह ४१ ग्रामपंचायतींवर “महिलाराज”
रावेर पंचायत समितीच्या अंतर्गत बहुचर्चीत वैयक्तीक शौचालय अनुदान योजनेत सुमारे दीड कोटीच्या अपहार झाल्याचे समोर आल्यापासून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. योजनेत झालेले भ्रष्ट्राचार प्रकरणी रोज नव नविन खुलासे समोर येत असून काल रात्री प्रभारी सहायक गटविकास अधिकारी दीपक बाबूराव संदानशीव (वय-५२) आणि सेवानिवृत्त विस्तार अधिकारी दीनकर हिरामण सोनवणे (वय-५८) यांना अटक करण्यात आलेली आहे.
सदरील प्रकरणात संशयित आरोपींची संख्या वाढत आहे. आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आली आहे. चौकशीतून अजून बरेच काही समोर येण्याची शक्यता आहे. चौकशीतून आणखी कोणकोण मासे गळाला लागणार हे समोर येईलच,परंतु आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून काही संशयितांवर अटकेची टांगती तलवार आहे.