तासखेडा ग्रामपंचायती कडून लंपी रोगावर जनावरांना लसीकरण
तासखेडा. ता.रावेर. मंडे टू मंडे न्युज.अनिल इंगळे। सध्या जनावरांना होत असलेल्या लंपी या आजाराने थैमान घातले असुन ह्या रोगाचा संसर्ग थांबावा म्हणुन गावातील पशुपालक यांनी रावेर तालुक्यातील तासखेडा या ग्रामपंचायतीकडे याची मागणी केली असता आज १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत मार्फत ४०० लसींच शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात गावातील जनावरांना आहे त्या ठिकाणी जाऊन लस देण्यासाठी डॉ. राजपुत तसेच परिचर विजय चौधरी, सावदा, डॉ. बारेला व परिचर सुनिल लोंखंडे,गहुखेडा, यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी यु.टी. महाजन ग्रामसेवक तासखेडा, तासखेडा ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील तसेच गावातील शेतकरी व पशुपालक प्रल्हाद पाटील, निवृत्ती पाटील, तेजस चौधरी, हिरामन चौधरी,मुरलीधर चौधरी, सदाशिव चौधरी, संतोष चौधरी, मधुकर कोळी सह आदी उपस्थित होते.