‘सात’ गावांच्या पशुधनाची जबाबदारी असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची रायपूर ग्रामपंचायत प्रशासक पदी नियुक्ती
तासखेडा. ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज.अनिल इंगळे। रावेर तालुक्यातील तापी परिसरात सध्या गायराण जमिन अतिक्रमणाबाबत चर्चत असलेल्या रायपुर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंचासह तिन सदस्य असे एकूण पाच जणांना रायपुर येथिल तक्रारदार मनोहर पाटील यांच्या तक्रारी अर्जावरून शासकीय जागेत अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या पाचही जणांना अपात्र केले होते.
बराच वेळ प्रशासकाच्या प्रतिक्षेत असलेल्या रायपुर ग्रामपंचायतीला गट विकास अधिकारी रावेर यांच्या आदेशानुसार पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ गहुखेडा येथिल पशुधन पर्यवेक्षक डॉ आसाराम बारेला यांची नियुक्तीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार डॉ बारेला यांनी दि.१६ नोव्हेंबर रोजी प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला. मात्र त्यांच्या या नियुक्तीने चहुबाजूंनी नांगरिकांमधे चर्चला उधाण पेटले आहे. कारण आधिच लंम्पी स्किन डिसीज या आजाराने जनावरे बाधीत झाली असता आता त्यांना पुन्हा एका नविन समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ते म्हणजे ज्या जनावरांना लंपी स्किम हा आजार झालेला होता त्यांच्या त्वचेवर आलेल्या गाठीमध्ये जंत पडून जखमा तयार होत आहे. या पशुधनाला होणाऱ्या जखंमामुळे पशुपालक मोठ्या चिंतेत पडला आहे. कारण डॉ साहेबांना एक- दोन नव्हे तर तब्बल सात गावांच्या पशुधनाची जबाबदारी असतांना सुद्धा डॉ. बारेला हे रायपुर ग्रामपंचायतीच्या प्रशासक म्हणुन आपली जबाबदारी कशी पार पाडतील ? याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाऊन नागरिकांमधे हा एक मोठा चर्चचा विषय ठरला आहे.
डॉ. बारेला यांची २०१७ मध्ये पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ गहुखेडा येथे पशुधन पर्यवेक्षक म्हणुन आपला पदभार स्वीकारला होता. त्यानंतर कोरोना काळात त्यांनी तासखेडा व गहुखेडा या दोन ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणुन आपली सेवा बजावली आहे. आणि आता त्यात अजून भर पडली ती म्हणजे रायपुर ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदाची, म्हणजे जनावरांवर लम्पि आजाराने कहर करून त्यांच्या त्वचेवर आलेल्या गाठीमध्ये जंत पडून जखमा मोठ्या होत आहेत,या सात गावांचा परिसर सांभाळून या आव्हाना सोबत ग्रामपंचायतीचा प्रशासक पदाचा कारभार म्हणजे तारेवरची कसरतच म्हणावी लागेल !