खासदार,आमदार व मंत्र्यांना बलवाड़ी गावात केळी पीक विमा मिळेपर्यंत गावबंदी
बलवाडी ,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। केळी पीक विम्याचे पैसे न मिळल्याने जिल्हाभरा सह राज्यात आक्रोश सुरू असून त्याचे लोण आता रावेर तालुक्यातील बलवाड़ी गावापर्यंत पोहोचले असून बलवाडी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत आक्रोश समिती स्थापन केली असून व त्यात जोपर्यंत पीक विम्याची सन २०२२-२३ मधील रक्कम मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्ष्याच्या नेत्यांना गावबंदी असणार आहे.असे सर्वानुमते ठरवले,
जळगांव जिल्हा हा केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यात रावेर तालुक्यात सर्वाधिक केळीची लागवड होत असून येथील केळी देशात नव्हे परदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यात तालुक्यातील केळी बेल्ट म्हणून तांदलवाडी, बलवाडी, खिर्डी,ऐनपूर,निंबोल, विटवा आदी भाग सर्वज्ञात आहे.असे असतांना प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२२-२३ मधील रक्कम आज मुदत संपून चार महिने होऊन सुध्दा शेतकऱ्यांना मिळालेली प्रत्यक्ष शेतात केळी असतांना ते प्रकरण पेंडिंग फॉर अप्रुवल किंवा रिजेक्ट असें दिसते. केळी पीक विम्याच्या कंपनीच्या सर्व अटी केळीचे टॅगगिंग फोटो, प्रीमियम, केळीची नोंद आशा इतर आवश्यक अटी पूर्ण असताना ती प्रकरणे रद्द कशी असा सवाल अन्यायग्रस्त शेतकरी करीत आहे.
वारंवार अर्ज देऊन,कृषी खात्याला तक्रार करून, जिल्हाधिकारी कडे मिटिंग घेऊन म्हणा का सर्व पक्षाच्या नेत्यांना भेटून सुद्धा काहीच फायदा होत नसल्याने त्रस्त शेतकरी ग्रामस्थांनी बलवाड़ी येथे एकत्र येत गावात येणाऱ्या मुख्य मार्गावर दोन्ही बाजूंना फलक लावणार असून जो पर्यंत पीक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय पुढारी, नेते, आमदार,खासदार यांना गावबंदी असणार आहे तसेच पुढील निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार टाकण्यात येणार आहे.