पूनखेडा येथील गटारींची साफसफाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर येथून जवळच असलेल्या पूनखेडा या गावातून जाणाऱ्या रावेर पातोंडी या रस्त्या जवळून जात असलेली मुख्य गटार दुर्गंधीयुक्त घाण पाण्याने व गाळाने पूर्णतः भरलेली असून या गटारितील पाणी वाहत नसल्यामुळे पाणी साचत असून नागरिकांना खूप त्रास होत आहे.तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे ऐन रात्रीच्या वेळेस आपत्कालीन लोड शेडींग सुरू असल्यामुळे रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांना बाहेर अंगणात थांबनेही आता मुश्किल होत आहे.
तसेच अनेक महिन्यांपासून गटारीचा उपसा न झाल्याने या ठिकाणी डासांची उत्पती मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांना हिवताप डेंग्यू,मलेरिया टायफॉइड सारख्या विषाणूजन्य आजारांना तोंड द्यावे लागते अशा परिस्थितीत ना हाताला काम ना खिशात दाम या मुळे गोरगरीब लोक डॉक्टर कडे उपचार घेवू शकत नसल्याने त्यांचे आरोग्य खालावले जाते. कोणाचे काही बरे वाईट झाल्यास यास जबाबदार कोण अशा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.ग्रा पंचायत प्रशासनाकडून तातडीने गटारीची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी रवींद्र पाटील, मायाबई रायमळे,भावेश पाटील,विनोद कोळी,धनराज सोनवणे, भरत कोळी,आशिष रायमळे,रुपेश चौधरी,पंढरीनाथ सपकाळे,ललित सपकाळे,यांनी केली आहे