खिर्डी येथे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामस्थ हैराण
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,भिमराव कोचुरे। रावेर तालुक्यातील खिर्डी खु या गावी गेल्या अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी टाकलेल्या उकिरडे मुळे आणि पावसाच्या पाण्याचे डबके साचल्याने तसेच मोकळ्या जागेत गवत उगवले मुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पती वाढत असल्याने संध्याकाळच्या वेळेस डासांचा त्रास होत असतो.
डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.तसेच घरात मच्छर कॉइल, व अगरबत्ती लावूनही डासांचा त्रास कमी होत नाही.परंतु संध्याकाळच्या वेळेस फॅन सुरू करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. विजेची बचत ही काळाची गरज असूनही नाईलाजास्तव ग्रामस्थांना विजेचा वापर करावा लागतो.तसेच डासांमुळे साथरोग पसरण्याची दाट शक्यता असूनही ग्राम पंचायत प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.तसेच गवतावर तणनाशकाची फवारणी करून फर्गिंग मशीन द्वारे धूर फवारणी करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांसह ग्रामस्थांनी केली आहे.