भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

“तू काय माधुरी दीक्षित आहे ? तुला एक दिवस उचलून घेऊन जाईन” रावेर तालुक्यात विवाहितेचा विनयभंग

रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यात “तू काय माधुरी दीक्षित आहे ? तुला एक दिवस उचलून घेऊन जाईन” अशी धमकी देत विवाहितेचा दोन तरुणांनी विनयभंग केल्याची घटना १० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमाराला घडली .

रावेर तालुक्यातील ३१ वर्षीय विवाहिता दुपारच्या वेळी घराच्या ओट्यावर कपडे धुत असता त्याच वेळी युनूस सायबू तडवी व इरफान नामदार तडवी हे दोघेही आले आणि आपसात बोलत उभे राहिले. यावर विवाहितेने तुम्ही याठिकाणी काय उभे राहिले?, तुमच्या अंगावर पाणी उडाले तर तुम्ही उलट मलाच बोलणार असे म्हणाली. त्यावर युनूस हा विवाहितेकडे पाहून तू काय माधुरी दिक्षीत आहे ?, एक दिवस तुला उचलून घेवून जाईन, असे म्हणाला.
त्याच्या सोबत असलेल्या इरफान हा देखील युनूसच्या बोलण्यात होकार देत एक दिवस तुला उचलून घेऊन जाऊ, असे म्हणत विवाहितेला शिवीगाळ करत दोघांनी लज्जा येईल असे कृत्य केलं. तसेच जर कोणाला काही सांगितलं तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही दोघांनी पिडीत विवाहितेला दिली. या प्रकरणी चार दिवसानंतर विवाहितेने रविवारी रावेर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरुन युनूस तडवी व इरफान तडवी या दोघांविरोधात रावेर पोलिसस्टेशनला विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघं आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!