भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

केळी पीक विमा महाघोटाळ्याचे मास्टर माईंड कोण? हा “कुंदन” कोण? किती वर्षांपासून सुरू आहे महाघोटाळा

अश्या प्रकारांमुळे मात्र खरा शेतकरी राजा पीक विमा पासुन वंचित !

रावेर-यावल तालुका,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क समूह। रावेर तालुक्यात केळी पीक विम्याचे करोडो रुपये परस्पर बोगस दस्तावेज तयार करून केळी पीक विम्याचे करोडो रुपये हडप केले, यांचे मास्टर माईंड कोण-कोण आहेत, कोणी -कोणी हडप केले, या बाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले असून यात अनेकांची नावे समोर आली आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून हे प्रकार सुरू असून यात करोडो रुपये हडप केले गेले आहेत. अश्या प्रकारांमुळे खरा शेतकरी राजा पीक विम्यापासून वंचित राहिला असून पीक विमा मिळावा म्हणून सरकार दरबारी पायपीट करावी लागत आहे. केळी पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचे करोडो रुपये हडप करणारांविरोधात सामाजिक,राजकिय व संबंधित शासकीय यंत्रणा गप्प का?असा सवाल केला जात आहे.

रावेर – यावल तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून केळी पीक विम्याचे करोडो रुपये हडप करणारे महाभागांमध्ये महत्वाचा मास्टर माईंड ” कुंदन ” नामक व्यक्तीने करोडो रुपयांची माया जमविली असून नातेवाईकांच्या नावां सह इतरांच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली असल्याची माहिती मिळत आहे. याचा याप्रकाराशी काय संबंध? हा कोण? हे समोर येईलच, या सोबत कोचुर, रसलपूर, बक्षीपुर, उदळी, विवारा,रावेर, रावेर स्टेशन आदी गावातील महाभागांची नावे समोर येत आहेत.

अश्या बोगस प्रकरणांमुळे खरा शेतकरी राजा मात्र हवालदिल झाला असून तोच या पीक बिम्यापासून वंचित राहत असून कुठे आंदोलनं तर कुठं लोकप्रतिनिधींना गाव बंदीचे ठराव शेतकरी करत आहेत. रावेर- यावल तालुक्यातील फैजपूर, चिनावल, वडगाव, जानोरी, चीचटी, कुंभारखेडा, विवारा,रावेर,उदळी, जिन्सी आभोडा, रसलपूर,बक्षीपुर,रावेर स्टेशन,रावेर,विवारा आदी गावात लाखो रुपये हडप केले गेले.

तसेच रावेर तालुक्यातील शिंदखेडा गावातील तिघांनी यात मूळचा बऱ्हाणपूर जवळील गावातील व्यक्ती त्याचे रा….र येथे दुकान आहे. तसेच बक्षीपुरचा रहिवासी असलेल्या व्यक्तीने रसलपूर शिवारातील शेतकऱ्याच्या एकत्रित शेती उताऱ्यावर दुसऱ्यांच्या हिस्स्यावर बोगस कागदपत्रे तयार करून रावेर येथील नातेवाईक असलेल्या व्यक्तीच्या नावावर खोट्या सह्या करून केळी पीक विम्याची रक्कम काढून हडप केली असल्याचे बोलले जात आहे.

शेतकऱ्यांच्या शेती उताऱ्याला पीक विम्याला लागणारे स्टॅम्प व इतर कागदपत्रांवर शेतकऱ्यांच्या बोगस सह्या करून ती कागदपत्रे जोडून कोट्यावधी रुपये हडप केले. एका २८ नावे असलेल्या शेती उताऱ्याला बनावट दस्तावेज तयार करून लाखो रुपये हडपले यात कोचुर येथील काही नावे समोर आली आहेत. भूमिहीनांनी सुद्धा केळी पीक विम्याचे लाखो रुपये बनावट कागदपत्रे तयार करून हडपले असल्याचे तालुक्यात चर्चिले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!