देशी-विदेशी दारूचा अवैध पुरवठा करणारी वरणगाव येथील ” ती ” चारचाकी कोणाची?
तासखेडा. ता.रावेर.मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील तापी परिसरात अवैध दारूची विक्री होत असल्याचे वृत्त “मंडे टू मंडे न्युज” ने प्रसारीत केले होते.
सदरचे वृत्त प्रसारित होताच तापी परिसरात होत असलेल्या अवैध देशी- विदेशी दारू विक्री अड्डे तूर्त बंद झाली.ती चारचाकी सध्या सावदा स्टेशन-गाते, थोरगव्हाण परिसरात फिरत असते, परंतु वरणगाव येथील ” ते ” मद्य पुरवठा करणारे व ‘ओमनी ‘ चारचाकी गाडी मालक कोण?
तापिकाठ परिसरात अवैध देशी-विदेशी दारू पुरवणारी वरणगाव येथील “ती ” चारचाकी गाडी कोणाची? त्या गाडीचा मालक कोण? दररोज लाखो रुपयांची देशी-विदेशी दारू पुरवणाऱ्यावर काय कारवाई झाली? हे गुलदस्त्यात असून या बाबत सेटलमेंट झाल्याची माहिती मिळत असून वरणगाव येथील “तो ” दारू पुरवठादार कोण? सदरची माहिती जनतेसमोर येणे गरजेचे असून “मंडे टू मंडे न्युज” मात्र याचा सविस्तर पर्दा फाश करणार!