रावेर तालुक्यातील विवरा येथे अंगावर वीज पडून महिलेचा जागीच मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। तालुक्यातील विवरा खुर्द येथे शेतात विहिरीजवळ अंगावर वीज पडून शेतमजूर महिलेच्या जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक असे, विवरे खुर्द येथील माजी सरपंच कविता राजेंद्र पाटील यांच्या शेतात वाघेला हे आदिवासी शेतमजूर कुटुंब झोपडीतच रहात होते. दुपारी चारला पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी नूरकी वाघेला (वय ३५) ही महिला शेजारच्या विहिरीवर गेली असता तिच्या अंगावर वीज कोसळून ती जागीच ठार झाली. यावेळी शेजारीच असलेल्या झोपडीत तिची भाची रोशनी (वय ९), मुलगा राहुल (वय ७) आणि मुलगी रवीना (वय ३) यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. याच शेतात दुसऱ्या बाजूला काम करणारा तिचा पती देखील सुदैवाने बचावला आहे. वीज पडलेला महिलेला तातडीने रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.