“तू मुझसे प्यार करती की नाही”अशी चिठ्ठी देऊन अल्पवयीन मुलीचा तरुणांकडून विनयभंग
Monday To Monday NewsNetwork।
रावेर (प्रतिनिधी)। रावेर येथील एका अल्पवयीन मुलीला तरुण युवक नेहमीच त्रास देत होता, युवकाकडून त्रास वाढल्याने अखेर पीडितेने घटनेची तक्रार रावेर पोलीसठाण्यात दिली त्या प्रमाणे पोलिसांनी संशयित आरोपी विरुद्ध विनयभंगासह पोक्सो कायदा कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले गेले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रावेर येथील एकवीस वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलीला लैंगिक सातावणूक करण्याचे उद्देशाने “तू मुझसे प्यार करती की नाही” असे चिट्ठीत लिहून लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले व अश्लील हावभाव करून मुलीशी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी आरोपी शेख कासीम शेख फरीद वय २१ राहणार इमाम वाडा रावेर याच्या विरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुडील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार नाईक करीत आहे .