भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

रावेर येथे विजयादशमी निमित्त, शस्त्रपूजन व घोष,वादन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। आज रावेर नगराचा विजयादशमीचा उत्सव पार पडला,या
प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील डॉ. भगवान कुयटे, अस्थीरोग तज्ञ तसेच प्रमुख वक्ते ऍड. अनिल जी मोरे भुसावळ, सह सदभाव प्रमुख होते.तसेच व्यासपीठावर तालुका संघचालक बी डी निळे उपस्थित होते.

1925 ला डॉ नी संघ स्थापना केली .जगात एकमेव 96 वर्ष अविरत चालली संघटन, शाखा व स्वयंसेवक हेच संघटनेचे बलस्थान, कुणा धर्मच्या विरोधात काम करीत नाही, भारत देशाला जो माता मानतो व तिला परमवैभवी स्थान प्राप्त करून देण्यासाठी स्वयंसेवक अविरत कार्य करीत असतो, शाखा ही व्यक्तिमत्त्व घडवणारे विद्यापीठ आहे, एक तासाच्या शाखेत बाल, तरुण नुसते खेळतच नाही तर देशाचा विचार करतात, जो माणूस शाखेत येत नाही तो संघाला ओळखू शकत नाही, स्थापन पासून राष्ट्राला अपेक्षित काय आहे, राष्ट्राची गरज ओळखून विविध आयाम सुरू झाले आहेत.स्वयंसेवक चे आचरण हे आदर्श असावे कारण समाज त्याच्या कडे आदर्श नजरेने पाहत असतो. अशी माहिती या वेळी देण्यात आली.


उत्सवाला 47 गणवेश धारी तर 8 मंगलवेष धारी असे एकूण 55 स्वयंसेवक उपस्थित होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रसलपुर उपखंड तालुका रावेर ,बक्षीपुर येथे,व रावेर येथे आज विजयादशमी निमित्त, शस्त्रपूजन व घोष, वादन करण्यात आले, याप्रसंगी उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रसलपुर येथील: अमर रमेश चौकसे ( एस, एन, टी, रेल्वे) तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भुसावळ येथील स्वयंसेवक केदार जी ओक उपस्थित होते, सोबत तालुका सहकार्यवाह जितेंद्र गवळी सर, व जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख सचिन रामकृष्ण महाजन हे देखील उपस्थित होते. उत्सवासाठी उपखंडातील एकूण 7,गावातून 55 स्वयंसेवक हे गणवेशात होते व अन्य दहा स्वयंसेवक होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!