सुकीनदी पात्रातून खुलेआम अवैध गौण खनिज वाहतूक; महसूल विभागाचे दुर्लक्ष…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन, भीमराव कोचुरे ।
खिर्डी ता.रावेर : वाळू उपसा बंद असताना, सकाळच्या वेळेस व रात्री बेरात्री खुलेआम पने बलवाडी येथील सुकी नदी पात्रातून बिनबोभाट पने अवैध गौण खनिज वाहतूक सुरू असून दररोज चार ते पाच ट्रॅक्टर द्वारे केली जात असून या परिसरातून सर्रास पने वाळू वाहतूक दारांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने महसूल विभाग बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे .
सध्या अव्वाच्या सव्वा दराने वाळू विक्री केली जात असून कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास अधिक दर मिळतो हे व्यावहारिक गणित आखून वाळू उपसा बंद असताना अवैध विना परवाना वाळू वाहतूक सुरू आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज येते कोठून हा सर्वसामान्यांना पडणारा हा साधा प्रश्न आहे. अवैध गौण खनिजाचा उपसा होत असून वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने महसूल प्रशासनाचा धाक अवैध गौण खनिज तस्करांना उरलेला दिसत नाही.
जोमाने सुरू असलेली ही अवैध गौण खनिज वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ? सर्वप्रथम हा प्रश्न उपस्थित होत आहे कडक कारवाई का होत नाही. पाणी कुठे तरी मुरत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे