बनावट रेशनकार्ड तयार करून खरेदी केलेली शेतजमीन सरकार जमा करण्याचे आदेश
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील डिगंबर बावस्कर रा. के-हाळे बु. यांनी बनावट रेशनकार्ड तयार करून खरेदी केलेली शेतजमीन सरकार जमा करण्याचे आदेश तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी दिला.
अधिक माहिती अशी की, डिगंबर रामचंद्र बावस्कर.रा. के-हाळे बु. ता. रावेर यांनी मौजे ताड जिन्सी ता. रावेर येथील गट नं. 139 क्षेत्र 3.57 हे.आर. शेत जमीन पैकी 2.00 हे.आ. ऐवढी शेत जमीन दिनांक 27/05/2011 रोजी खरेदी केली होती. परंतु खरेदी करतांना डिगंबर रामचंद्र बावस्कर यांनी मी शेतकरी कुटुंबातील आहे. असे भासविण्यासाठी त्यांनी बनावट रेशनकार्ड तयार करुन शेत जमीन खरेदी केली होती. डिगंबर रामचंद्र बावस्कर विरुध्द शेत जमीन न्यायाधिकरण ,तथा तहसिलदार रावेर यांचे न्यायालयात महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 84 (क) दावा दाखल केलेला होता. प्रतिवादी डिगंबर रामचंद्र बावस्कर यांच्या विरुध्द वादी सोभा प्रभू पवार आणि रेश्मीबाई कमलसिंग चव्हाण दोघ रा. ताडजिन्सी ता. रावेर यांनी दावा दाखल केला होता. त्याचे जनरल मुख्त्यार यांनी दाव्या संदर्भात माहिती पुरविली. तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या समोर वादी आणि प्रतिवादी याच्या वकिलांचे युक्तीवाद ऐकुन दिनांक 30/09/2021 रोजी सदर शेतजमीन सरकार जमा करण्याचे आदेश केले आहे.