सहस्त्रलिंग येथे चक्रीवादळा सह जोरदार पाऊस, घराची भिंत पडून नुकसान
Monday To Monday NewsNetwork।
पाल.ता रावेर-प्रतिनिधी/सुरेश पवार: रावेर तालुक्यातील पाल शिवारात सहस्त्रलिंग येथे सोमवारी चक्रीवादळा सह जोरदार पाऊस झाल्याने कोणाच्या घरावरील पत्रे उडाली तर कुणाच्या घराच्या भिंत पडल्याने रहिवाशांचे नुकसान झाले आहे. जनावरांचा साठवलेला चाराही खराब झाला आहे.
याबाबत सविस्तर असे, पाल परिसरात दिवस भरापासून ढगाळ वातावरण होऊन दूपरी तीन वाजेपासून अचानक चक्रीवादळ सह जोरदार पाऊस आणि काही प्रमाणावर गारा ही पडल्या, यात सुलेमान इब्राहिम तडवी यांच्या पंतप्रधान घरकुल योजनेतील नुकत्याच बांधलेलय नवीन घराची बांधकामाची भिंत पडून मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही त्याच बरोबर लतीब दगडू तडवी,सलीम सुलेमान तडवी,,सलीम महेबु तडवी,भिकारी तडवी, बिस्मिला तडवी,यांच्या घरावरील पत्रे उडून लांब शेतात जाऊन पडली तर काही पत्रे बेपत्ताच झाली त्याचबरोबर गावातील अनेक ठिकाणी कुणाची छपरे ,कौलारू घराचे नुकसान झाले तसेच गुरांसाठी साठवून ठेवलेल्या कोरडा चाराही खराब झाला आहे या अचानक आलेल्या पावसाने अनेक दिवसापासून कोरडयाठाक पडलेल्या नाल्याला पूर आला तरी झालेल्या नुकसानाची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.