पाल नजीक गस्त घालणाऱ्या पोलिसांवर गोळीबाराने खळबळ !
Monday To Monday NewsNetwork।
पाल.ता रावेर (प्रतिनिधी)।आज दि ११ रोजी सकळी मोठ्या पहाटे पाल पासून आठ किमी अंतरावरील सहस्त्रलिंग जवळ रावेर पोलीस गस्त घालण्यासाठी आले असता अचानक गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली असून आरोपी गावठी बंदुक टाकून फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली.
सविस्तर वृत्त असे की पाल पासून जवळच असलेल्या सहस्रलिंग रस्त्याने रावेर पोलीस नेहमीप्रमाणे गस्त घालण्या करिता आले असता गावा पासून दीड कि.मी. अंतरावर पुलाजवळ काही अज्ञात दरोडेखोरानी गोळीबार करून पोलिसांवर भीती निर्माण करण्याचे प्रयत्न केल्याची घटना घडली अचानक गोळीबार झाल्याने पोलीसानी समोर जात असलेल्या तीन दुचाकी स्वाराचे पाठलाग केले असता दरोडेखोर गावठी बंदूक फेकून फरार झाले सकाळी दहा वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ मुंडे,अप्पर पोलीस अधिक्षक गवळी ,विभागीय पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली
अश्याच प्रकारे अनेक वेळा याच रस्त्याने रात्री जाणाऱ्या गाड्याच्या लुटीची घटना पूर्वी झाली असून अद्याप ही दरोडेखोराचे तपास लावण्यात पोलिसना यश आले नाही,सकाळी ३ वाजेच्या सुमारास सहस्त्रलिंग शिवारात पोलीस पेट्रोलिंग करत असताना अचानक गोळीबाराचा आवाज बंदूक सोडून शिकारी पसार झाले. गोळी बार करणारे,नेमके दरोडेखोर होते की शिकारी, हें अजून गुलदस्त्यात आहे.
————————————————
रात्री पोलीस गस्त घालत असताना तीन दुचाकी स्वार शिकारिवर पोलिसाची नजर पडल्याने शिकारी घाबरून पलायन करताना त्याच्या हातातून बंदूक पडून गोळीबार झाला,त्यांनी पोलिसांवर गोळीबर केला नाही आणि ते दरोडेखोर नव्हते शिकारी होते. राजेंद्र राठोड
पोलीस हवालदार पाल. पो. चौकी