रावेर शौचालय घोटाळा प्रकरणात आणखी दोन जणांना अटक !
रावेर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : रावेर पंचायत समितीच्या (Raver Panchayat Samiti) स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वयक्तिक शौचालय घोटाळा प्रकरणात अटक होणाऱ्याची संख्या वाढत असून रात्री अजुन दोन आरोपींना खिरोदा प्र रावेर व खिरवळ येथून पोलिसांनी अटक केली आहे.
- …आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध, लवकरच बिगूल वाजणार ?
- राज्यात पुन्हा दोन उपमुख्यमंत्री? परंतु मुख्यमंत्री कोण? उपमुख्यमंत्री कोण? केव्हा होणार शपथ विधी? महत्वाची माहिती आली समोर
- संपूर्ण जळगाव जिल्हा भगवामय, जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ११ जागा महायुतीच्या ताब्यात
रावेर पंचायत समिती मधील वयक्तीक शौचालय योजनेत झालेले भ्रष्ट्राचार प्रकरणी रोज नव नविन खुलासे समोर येत असून संशयित आरोपींची संख्या वाढत आहे. काल रात्री खिरोदा प्र रावेर येथून सतीष वामनराव पाटील तर ख़िरवळ येथून महेंद्र बिसन गाढे दोघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली असून एकूण आरोपींचीं संख्या दहा वर पोहचली आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय घोटाळा प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी सोमवारी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांची तब्बल तिन तास चौकशी करून अधिका-यांनी त्यांचा जबाब नोंदवला होता त्यानंतर सायंकाळी काही बँक अधिका-यांची देखिल चौकशी तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांच्याकडून करण्यात आली होती.