रावेरमध्ये किराणा दुकान फोडणारा पोलिसांच्या ताब्यात !
रावेर (प्रतिनिधी)। शहरातील १५ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री दुकान फोडून साडेसात हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या महेंद्र उर्फ गोंड्या ज्ञानेश्वर कोळी (वय-२४, रा. नवीन निंबोल) आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील गांधी मार्केटमधील अशोक ग्यानचंद मुलचंदानी (वय-६०) यांचे सुरज किराणा नावाचे बंद दुकान १५ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडत ७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवीत महेंद्र उर्फ गोंड्या ज्ञानेश्वर कोळी (वय-२४ रा. नवीन निंबोल ता. रावेर) याला अटक केली असून ही कारवाई विभागीय पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना. महेंद्र सुरवाडे, पो.कॉ.सुरेश मेढे, पो. कॉ. तुषार मोरे, पो.कॉ. मनोज म्हस्के, पो.कॉ.भरत सोपे यांनी कारवाई केली. दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. सतिष सानप हे करीत आहे