भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय म्हणजे, ‘उशिरा सुचलेले शहाणपण’– एकनाथ खडसेंचे टीकास्त्र

रावेर, प्रतिनिधी : केंद्र सरकारकडून कृषी विषयक तीन कृषी कायदे संसदेत पारित करण्यात आले होते हे तीन कृषी कायदे आज मागे घेण्याचा निर्णय घेतला हा शेतकऱ्यांचा एकजुटीचा विजय असून पण हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे टीकास्त्र सोडत आज रावेर येथे बोलतांना राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केंद्रावर तोफ डागली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुक प्रचार संदर्भात रावेर येथे सहकार पॅनलच्या मेळाव्याप्रसंगी संवाद साधताना खडसे म्हणाले, भारतीय जनता पक्षाला नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे केंद्र सरकारला ते तीन कृषी कायदे रद्द करावे लागले आहेत. केंद्र सरकारने हा उशिरा का होईना पण शहाणपणाचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांवर अत्याचार करण्यात आले. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्यांच्यावरती लाठीमार करण्यात आला, यात अनेक शेतकऱ्यांना मरण आले. पण शेतकऱ्यांनी एकजूट दाखवल्यामुळे केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. खरं तर हा निर्णय खूप उशिरा घेण्यात आलेला असून उशिरा का होईना हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे म्हणत एकनाथराव खडसे यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!