दुर्गंधी युक्त सांडपाण्यामुळे पूनखेडा वासियांचे आरोग्य धोक्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर येथून जवळच असलेल्या पूनखेडा या गावातून जाणाऱ्या पातोंडी रस्त्याच्या दोन्ही साईड ला असलेल्या गटारी मध्ये गाळ साचल्याने पूर्णतः गटारी जमीन लेव्हल झाल्या असून गावातील दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्याने पाणी त्याच ठिकाणी साचत असून सदर ठिकाणी डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना याचा खूपच त्रास होत आहे.तसेच डासांमुळे चिकन गुनिया,मलेरिया, टायफॉइड इत्यादी आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर समस्येकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज असून लवकरात लवकर नवीन गटारीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.