रावेर येथे विविध पक्षांच्या वतीने निदर्शने
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे वृत्तसंकलन। हुकूमशाही व देशभरात होत असलेले हल्ले आणि शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांच्या विरोधात आज रावेर तालुक्यातील विविध पक्ष संघटनांकडून रावेर तहसिलदार आवारात निदर्शने करत तहसिलदार कार्यालयामार्फत राष्ट्रपतीं,व राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्याना आशा प्रकारचे निवेदन देवून निषेध नोंदविण्यात आला.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलक शेतकऱ्यांना भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. बारा पेक्षा अधिक शेतकऱ्यांना भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात आले.
निवेदनातील मागण्या -1)केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. टेनी यांनी राजिनामा द्यावा. २)केंद्रीय राज्य मंत्री चा मुलगा आशिष मिश्रा व त्यांच्या बरोबर हल्ल्यात सामील असणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा व सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करा,३) मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपये मदत व त्यांच्या मुलांना नोकरी तसेच जखमी शेतकऱ्यांना 25लाख रुपये नुकसान भरपाई मदत द्यावी. 4) संविधानिक पदावर असताना लोकांना हिंसा करण्यासाठी भडकवणाऱ्या हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करावे केंद्र सरकारने तीन केंद्रीय कृषी कायदे केले आहेत. मोठ्या उद्योगपतींना नफा कमावता यावा यासाठी प्रसंगी शेतकऱ्यांचे बळी घेत केंद्र सरकारला हे कायदे अमलात आणायचे आहेत. मात्र संयुक्त किसान मोर्चा केंद्र सरकारचे हे कुटील कारस्थान कधीही साध्य होऊ देणार नाही. संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती ने अत्यंत नेटाने लोकशाही चौकटीत व शांततेच्या मार्गाने आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. व यापुढे आंदोलन अधिक तीव्र करेल व जोपर्यंत हे तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द केले जात नाहीत व शेतकऱ्यांना शेती संकटातून बाहेर काढण्यासाठी किफायतशीर आधारभूत भावाचे संरक्षण देणारा केंद्रीय कायदा केंद्र सरकार करत नाही तोपर्यंत हा लढा सनदशीर मार्गाने शेतकरी संघटना सुरूच ठेवतील.
तरी शेतकरी हिताचा निर्णय व्हावा ,आशा आशयाचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संजय तायडे देण्यात आले,या वेळी राजीव पाटील माजी उपाध्यक्ष तालुका ध्यक्ष काँग्रेस ज्ञानेश्वर महाजन तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी निळकंठ चौधरी शिवसेना तालुकाध्यक्ष योगीराज पाटील, जिल्हाध्यक्ष किसान सभा सोपान पाटील, माजी आमदार अरुणदादा पाटील, मा. जिल्हाध्यक्ष जि. प.मुरलीधर तायडे ,संंतोष महाजन,महेश लोखंडे, पंकज वाघ ,गणेश बोरनारे ,रामदास लहासे, भरत कुवर,प्रकाश पाटील धनराज पाटील, संजय जमादार,प्रताप राठोड,प्रकाश खैरे,संदीप सैमिरे,दशरथ जाधव, आर बी महाजन,प्रकाश सुरदास,योगेश पाटील, विनायक महाजन,दिपक पाटील,श्याम राणे, मायाजाल बारी,आयुब मेंबर,नितीन महाजन, अशोक शिंदे,ईमरानखान, भागवत चौधरी,राजु सवर्णे,कुणाल महाले, प्रणीत महाजन,सचिन पाटील,सावन मेढे, ईमरानभाई,सुरेश पाटील,यशवंत धनके, आरीफशेख,हरीषशेठ, मलक गफ्फार,मलक साहिल,गफ्फार तडवी, बबीता तडवी,मानसी पवार ,योगेश गजरे, संरक्षक तायडे,पांडुरंग पाटील इत्यादी कार्यकर्ते हजर होते.