भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रेंभोटा शिवारातील गट नं. 277 मध्ये अवैद्य माती उत्खनन,तक्रार करूनही कारवाई शून्य,चौकशीची मागणी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर,ता. रावेर, मंडे टू मंडे प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील रेंभोटा शिवारातील ग्रामपंचायत मालकीच्या गट नंबर २७७ मध्ये दि.१९-१-२२ रोजी पोकलेनच्या साह्याने उत्खनन करून डंपर द्वारे मोठ्या प्रमाणात मातीची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले असून तक्रारदार यांनी स्पॉटवर पोकलेन चालक यांचेकडे चौकशी केली असता सदरील मशिनरी व वाहतूक करणारे डंपर हे नामांकित काँट्रक्टर यांचे मालकीचे असल्याची व सदरील मातीचा उपयोग हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या खिर्डी/रेंभोटा ते अजंदा रस्त्याची दर्जोंनती करणेच्या कामासाठी सुमारे १०० ते १२० डंपरच्यावर माती उत्खनन करून वापर करण्यात आला असल्याची माहिती मशिनरी चालकाने दिली.

सदरील वाहतूक ही MH.१९CY.५७१८ MH.१९CY.५७१९, MH.१९CY.५७२०, MH.१९.CY.४३८३ या डंपरद्वारे बेकायदेशीररीत्या करण्यात आली असून सदरील कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे कुठल्याही प्रकारची परवानगी नसल्याचे तलाठी यांनी सांगितले. अवैधरित्या माती उत्खनन होत असल्याची माहिती तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी सदरील जागेची पाहणी करून आम्हाला रितसर तक्रार अर्ज दिल्यावर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली परंतु तक्रारदार यांनी २४-१-२२ रोजी तक्रार अर्ज दाखल केल्यावर सुध्दा अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

अवैद्य माती उत्खनन हा भाग रेम्बोटा ग्रामपंचायत चा
अवैद्य माती उत्खनन हा भाग रेम्बोटा ग्रामपंचायत गट 277 येत असून अवैद्य माती उत्खननाचि परवानगी कोणी घेतली , घेतली तर कोणत्या अधिकाराने घेतली कि आर्थिक व्यावहारातून तर काही नाही ना असे अनेक प्रश्न उद्भवतात. या बाबद तलाठी यांना विचारले असता त्यांनी या प्रकारची कोणतीही परवानगी घेतली नसतांनाचे सांगितले.

कारवाई वर प्रश्नचिन्ह:-
तक्रारदाराला अवैद्य माती उत्खनन् करतांना निदर्शनात आले तेव्हा संबधित अधिकाऱ्याला लक्षात आणून दिले असता तरी कारवाईसाठी विलंब का? मंडळाधिकारि यांना तक्रार केली त्या दिवशीच जागेची पाहणी केली अजुन पर्यंत का कारवाई केली नाही असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तलाठी व मंडळाधिकारी यांचे दुर्लक्ष
रेम्बोटा अजन्दे रस्ताच्या कामासाठी बेकायदेशीररीत्या रेम्बोटा शिवारातील गट नं 277 मध्ये मातीचे उत्खनन झाले आहे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला गेला याकडे प्रशासन अधिकारी, तलाठी व सर्कल हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

प्रतिक्रिया:-
रेम्बोटा शिवारातील गट नंबर 277 मधिल अवैद्य माती उत्खनन व बेकायदेशीररीत्या वाहतूक केल्याबाबत संबंधितांवर कारवाई करावी.अन्यथा आमरण उपोषणाला बसेल. तक्रारदार:-विनायक जहुरे

प्रतिक्रिया:-
तक्रारदार यांचा जवाब घेतला असून संबधित लोकांना नोटीस पाठवली आहे पुढील कारवाई लवकरच करण्यात येईल.
मंडळाधिकारी -मीना तडवी

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!