बनावट रेशन कार्ड प्रकरणी रेशन दुकानाचा परवाना रद्द
रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील केऱ्हाळा येथील स्वस्त धान्य दुकानादार बनावट रेशनकार्ड बनवून शेती घरेदीसाठी पुरावा म्हणून देण्याचे प्रकार समोर आला होता याप्रकरणात रेशन दुकानाचा परवाना रद्द करत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील केऱ्हाळा येथील रेशन दुकानदार डिगंबर बाविस्कर यांनी शेतकरी नसतांना शेती खरेदीसाठी तात्कालीन नायब तहसिलदार व अव्वल कारकुन यांच्या बनावट सह्या व शिक्क्याचा वापर करून बनावट रेशन कार्ड तयार करून शेती खरेदीसाठी पुरावा म्हणून वापर केल्याचे समोर आल्याने न्यायालयाच्या आदेशावरुन पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर महाराष्ट्र अनुसूचित वस्तु वितरण विनीयमन आदेशातील अटी-शर्तीचा भंग केल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी बाविस्कर यांचे स्वस्थ धान्य रेशन दुकानाचा परवाना रद्द करत कारवाई केली असून त्यांच्या ताब्यातील शिक्के ताब्यात घेतले आहे.