भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा रावेर भाजपातर्फे तहसीलदारांना प्रस्ताव

रावेर प्रतिनिधी । शेतकर्‍यांच्या हिताचे कृषी विधेयक केंद्र सरकारने मंजूर करण्यात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या अभिनंदनाचा ठराव भारतीय जनता पार्टी तालुक्याच्यावतीने करण्यात आला. यासंदर्भात प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत अधिक असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर व राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी शेतकर्‍यांच्या जीवनातील ऐतिहासिक असे कृषी विषयक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात आवाजी मतदानाने नुकतेच मंजुर करण्यात आले आहे. ठरावात म्हटले आहे, शेतकरी बंधनमुक्त झालेला आहे, शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच शेतकर्‍यांना संरक्षण व त्यांच्यापर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहचवण्याचा मार्ग मोकळा झाल्याने केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करून प्रभारी तहसीलदारांना देण्यात आला याप्रसंगी भाजपच्या किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस सी.ए स.पाटील, महेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रेखा बोंडे, शहराध्यक्ष दिलीप पाटील, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!