भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर शिक्षण संवर्धन संघावर साडे ७ लाखांची दंडात्मक कारवाई

रावेल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : रावेर शहरातील स्टेशन रोड लगत शिक्षण संवर्धन संघातर्फे सरदार जी. जी. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच सोके एस अग्रवाल कन्याशाळा चालविली जाते.  गट नंबर ५२१ व  ५२२ या शेतसारा माफियांच्या जागेवर पक्त शाळेच्या वापरासाठी परवानगी होती. परंतु संस्थेने या जागेचा अनधिकृत वापर करुन विना परवानगीने व्यापारी संकुल उभारल्याने शर्त भंग झाल्यामुळे फैजपूर  विभागाचे प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी रावेर शिक्षण संवर्धक संघाला सुमारे ७ लाख ४६ हजार ३६३ रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिल्याने संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.

रावेर तालुक्यातील अंत्यत नावाजलेल्या संस्थे पैकी एक शिक्षक संवर्धक मंडळ ही संस्था रावेर शहरात सरदार जी .जी . हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज व कमलाबाई गर्ल्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज ह्या संस्थेच्या असुन ह्या गट न ५२१ व ५२२ ह्या जागेवर फक्त (शेतसारा ) माफीच्या जागेवर फक्त शाळेच्या खोल्याची परवानगी असतांना हया संस्थेच्या संचालक मंडळ व चेअरमन यांनी आपले राजकीय वरदहस्त यांचा वापर करीत हया जागेत अवैध असे सर्रास कोणतेही परवानगी न घेता संस्था संचालक मंडळ यांनी जवळपास सत्तर दुमजली अनधीकृत (विनापरवाना ) गाळे बांधकाम करून संचालक मंडळ यांनी स्वत: व इतर लोकांना ९९ वर्षाच्या करारनामे करून , खालील गाळे [पाच लाख व दोन हजार रुपये प्रति महीना,] व वरचा गाळा (तीन लाख व १हजार रुपये प्रति महीना) तसेच पाच वर्षा नंतर दहा टक्के भाडे वाढ ] वाढविण्याच्या अटीवर प्रत्येकास संचालक मंडळ यांनी हे गाळे दीले आहेत,

सदरहून ही संस्थेची शाळेची जागा रावेर शहरामध्ये स्टेशन रोड मध्यवर्ती असल्याने येथे व्यापारी संकुलसाठी बऱ्याच लोकांनी दहा दहा लाख रुपये देवुन गाळे घेतल्याचे कळतेय फक्त शाळेसाठी परवानगी असतांना असे गाळे बांधकाम झाले कसे ह्या मुद्यावर श्री जिवन गांगवे यांनी आक्षेप नोंदवत ३० डिसेंबर २०१९ ला शाळेच्या जागेवर कायदेभंग करीत विनापरवाना गट न . ५२१ व ५२२ मध्ये ३२५६ सुमारे चौ मिटर क्षेत्रावर फक्त शाळेची वापरास परवानगी असतांना शाळेत मोकळी हवा येणे गरजेचे असल्याचे, या गोष्टीचा विचार न करता संचालक मंडळ यांनी शर्तभंग करीत दुमजली गाळे बांधले यांची तक्रार जीवन गांगवे यांनी केल्यानंतर रावेर तहसीलदार यांनी चौकशी करून प्रांतधिकारी कड़लक यांना अहवाल सादर केला त्यात त्रृटी जाणविल्याने संस्थेवर ७ लाख ४६ हजार ३ ५६ रुपये दंडात्मक कारवाई करीत १५ दिवसात हे पैसे त्वरीत भरण्याचे आदेश दिले आहे व हे पैसे भरल्या नंतर ही वाणिज्य खाते , नगर रचना विभागाचे ना हरकत (Noc ) दाखले सुमारे १९५० पासुन सात बारा उतारे हे बिन शेती असल्याचे परवानगी आदेश सादर करावे व ह्या क्षेत्राचे योग्य मोजणी नकाशा याच्यासह लागणारी महत्वाची इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी तसेच वाणिज्य प्रयोजन बिनशेती वापर नियमीत करून घेण्यासाठी माननीय रावेर तहसीलदार रितसर कागदपत्रे सादर करावी असे न झाल्यास हया जागेवरील गाळे बंन्द करावे असे सक्त आदेश देण्यात आले, असे न झाल्यास हे जागेवरील सर्व दुकाने ( गाळे ) हे अधिकृत परवानगी नसल्याने हे बांधकाम झालेले सर्व गाळे पाडण्याची कारवाई करण्यात येईल सदरहून असे फैजपुर प्रांतधिकारी कडलग यांच्या आदेशपत्रात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!