भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेरमध्ये तोतया पोलीसांकडून “तुम्ही गांजाची तस्करी करतात, म्हटत शेतकऱ्यांचे १८ हजार लांबवले !

रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरात एक शेतकऱ्यांची दोन तोतया पोलिसांनी तुम्ही गांजाची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली असून आम्हाला तुमची तपासणी करायची आहे असे सांगून वृध्द शेतकर्‍याकडील १८ हजार रूपये लंपास करून पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील धुरखेडा येथील शेतकरी चिंधू तोताराम धनगर वय-६५ हे बैलाची विक्री करून आलेली रक्कम १८ हजार रुपयांत ती रक्कम बँकेत ठेवण्यासाठी व दिवाळीनिमित्त सामान खरेदीसाठी मुलीसह रावेरला आला होता. दरम्यान, शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन तोतया पोलिसांनी चिंधू धनगर यांना अडवत तुम्ही गांजाची तस्करी करतात अशी माहिती आम्हाला मिळाली असून तुमची तपासणी करायची आहे सांगून खिशात असलेले १८ हजार रुपये घेऊन त्या दोघ तोतया बनून आलेल्या पोलिसांनी पळ काढला दरम्यान, तपासणीच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चिंधू धनगर यांनी पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

तोतया पोलिसांकडून नागरिकांची फसवणूक झाल्याची शहरात ही पहिली घटना नसून या पूर्वीही शहर व तालुक्यात तोतया पोलिस बनून आलेल्यानी नागरिकांची फसवणूक केल्याच्या तीन घटना घडल्या आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!