भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

ग्राहकांना टोकन न देता जास्त पैशांची मागणी करून वरचा क्रमांक देऊन दस्तांची नोंदणी; सावदा दुय्यम निबंधक महाशयांचा प्रताप, वरिष्ठांच्याच आशीर्वादानेच का ,,,,, !

सावदा (विशेष प्रतिनिधी)। येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करण्यासाठी क्रमांकावर ठेवले असता टोकन दिले जात नाही, शिरजोर अधिकारी कडुन अधिक रुपयाची मागणी केली जाते व घेतल्या शिवाय कामच करीत नाही, सामान्य शेतकरी-नागरिकांची सर्रास पिळवणूक केली जाते यांना आशीर्वाद कोणाचा…. ?”

हे निडर अधिकारी मिळालेल्या कमाईतून वर पर्यंत रसद पुरवली जात असल्याचे सांगितले जाते, यांचा असा समज आहे की आमचे कोणीही काही बिगडऊ शकत नाही ,वरिष्ठांच्या पाठबळाशिवाय, आशीर्वादा शिवाय हे कसे शक्य आहे….!

सावदा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अनागोंदी कारभार बद्दल , ” सावदा दुय्यम निबंधक कार्यालयात अडवणूक ,ग्राहकांची आर्थिक लूट “ या मथड्याखाली कालचमंडे टू मंडे “ ने वृत्त प्रकाशित केले होते , जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त शासनाला महसूल देणारे नंबर एक क्रमांकाचे एकमेव दुय्यम निबंधक कार्यालय हे सावदा येथील गणले जाते,या कार्यालयात शासकीय नियमांची ऐशी की तेशी करून कशा प्रकारे आर्थिक लूट केली जाते व शेतकरी- सामान्य नागरिकांची कशी पिळवून सर्रास होत आहे याचे फक्त काही नमुने दिले होते, शेतकऱ्यांसह इतर नागरिक या ठिकाणी शेती, घर, प्लाट ,आदी खरेदी- विक्री करीता तसेच नजरगहाण, बक्षीस पत्र, हक्कसोडपत्र,बोजा बसवणे ,कमी करणे करिता परिसरातील १०० च्या वर गावातील, यात सावदा व फैजपूर ही दोन मोठी शहरे व कित्येक मोठमोठी गावे अश्या लहानमोठ्या गावांचा यात समावेश असल्याने या ठिकाणी मोठं मोठे खरेदी -विक्री चे व्यवहार होत असतात.

हे ही वाचासावदा दुय्यम निबंधक कार्यालयात अडवणूक ,ग्राहकांची आर्थिक लूट

सावदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात काही दस्तावर सह्या नसताना नोंदणी साठी क्रमांकावर ठेवले जातात , काही दस्त पूर्ण असले तरी काही व्यक्तीचा दस्त जाणून बुजून लेट नोंदविणेस ठेवला जातो, बरेच ग्राहक बाहेर गावाहून ,तर काही मुंबई,पुणे ,नाशिक आदी,गावाहून आलेले असतात, ज्यांना घाई असते त्या ग्राहकांकडून जास्त पैशांची मागणी केली जाते, दस्त लवकर नोंद करणेची विनंती कोणी केली तर जास्त पैशांची मागणी करून दस्त वरच्या क्रमांकाना ठेऊन त्यांची नोंदणी केली जाते,अश्याही प्रकारे ग्राहकांची आर्थिक अडवणूक करून आर्थिक लूट केली जात असल्याचे सांगितले गेले या पिळवणुकीला जबाबदार कोण असे प्रश्न नागरिक विचारीत आहे,

वाढलेल्या गवतामुळे ग्राहकांना सर्पदंश ची शक्यता- जिल्ह्यात क्रमांक एकचे दस्त नोंदणी कार्यालय असताना या कार्यालयाच्या आवारात मोठया प्रमाणावर गवत वाढलेले असून या गवतात साप, विंचू सारखे विषारी प्राणी असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, आर्थिक कमाईच्या धंदात येथील गवत काढण्याकडे सुद्धा कोणाचे लक्ष नाही ,रोज या कार्यालयात ग्राहकांची दस्त नोंदणी साठी यात्रा भरलेली असते,तेव्हा गवता मुळे एखाद्याला साप, विंचू ,अश्या विषारी प्राण्याने दंश केला तर याला जबाबदार कोण ,,, ? ( भाग २ )

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!