सावदा येथे ट्रकसह १० लाख ७२ हजाराचा मिराज तंबाखू जप्त; अवैध तंबाखूजन्य विक्रेत्यामध्ये खळबड
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा (विशेष प्रतिनिधी)। सावदा -फैजपूर रोडवरील डायमंड तोल काट्या समोर ६ लाख ७२ हजार रुपये किमतीचा मिराज स्वदेशी तम्बाखु व ४ लाख रुपये किमतीची ट्रक असा एकूण १० लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाई करत सावदा पोलिसांकडुन जप्त करण्यात आला आहे.
या बाबत सावदा पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज दि, २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजून १० मिनिटानी सावदा-फैजपूर रोडवरील डायमंड तोल काट्या समोरील मोकळ्या जागेवर उभ्या असलेल्या मालट्रक क्र. MP 09 kc 6897 या मध्यप्रदेश मधील ट्रकची तपासणी केली असता, यामध्ये ६ लाख ७२ हजार रुपये किमतीचे २० HDPE बॅग पैकी प्रेत्येक HDPE बॅग मध्ये चार कार्टून बॉक्स अशा प्रत्येक कार्टून बॉक्स मध्ये ४२ लहान बॉक्स मिराज स्वदेशी तंबाखूचे व तसेच ४ लाख रुपये किमतीचा माल ट्रक क्र.MP. 09 KC 6897 हा मिळून ऐकून १० लाख ७२,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामधील निर्मल मिलन सोलंकी, हा फरार असून कमल सुभान मंसुरे, वय- ३३ दोन्ही रा.बागफल ता.बडवा, जि.खरगोन, मध्यप्रदेश यास ताब्यात घेण्यात आले असून, याबाबतची फिर्याद अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद वसंत कांडेलकर, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी सावदा पोलीस स्टेशनला दिली असून पोलीस ठाणे प्रभारी सपोनि उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक आर,डी, पवार, दाखल अंमलदार पोना संजीव चौधरी, हे पुढील तपास करीत आहेत, सदरच्या कारवाई मुळे गुटका व आरोग्यास हानिकारक अवैध तम्बाखु जन्य पदार्थ विक्रेत्यामध्ये खळबड उडाली आहे.