सावदा येथे डम्पर चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यु !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
सावदा, प्रतिनिधी । सावद-रावेर रोडवरील अंधारात उभ्या असलेल्या डम्परवर धडकून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काल रात्री सावद-रावेर मार्गावरील महेंद्र ढाबा, हॉटेल कुंदन जवळ रस्त्यावर अंधारात उभ्या असलेल्या डम्परवर सावदा येथील गवत बाजार परिसरातील रहिवासी व रेणुका नर्सरीचे संचालक लक्ष्मण पाटील (वय -६०) हे दुचाकी वरून जात असतांना त्यांचा डम्परला धडकून मृत्यू झाला. याप्रकरणी मुलगा भूषण पाटील यांच्या फिर्यादीवरून रस्त्यावर अंधार असूनही इंडिकेटर न लावता निष्काळजीपणे वाहन उभे केल्यानेच ही घटना घडली म्हणून K-MH१९-CY-४८७६ या डम्पर चालाकाविरोधात गु र न ९६ भा.द.वि.कलम ३०४-अ, २७९, ३३७, ३३८, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पो हे कॉ उमेश पाटील करीत आहे.