जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा गाते तंबाखू मुक्त घोषित
गाते, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जळगाव जिल्हातील काही शाळा तंबाखू मुक्त शाळां होण्याचा दिशेने वाटचाल करीत आहेत त्या अनुषंगाने जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जळगाव अंतर्गत, थोरगव्हान प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा गाते तंबाखू मुक्त घोषित करण्यात आले आहे.
सलाम मुंबई फौंडेशन जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा यांचा सयुक्तिक विद्यमाने जळगाव जिल्हातील काही शाळा जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळांचा होण्याचा दिशेने वाटचाल करीत आहेत त्या अनुषंगाने जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जळगाव अंतर्गत, तालुका गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्यधिकारी यांचा मार्गदर्शन खाली थोरगव्हान प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा गाते येलो लाईन कॅम्पईन अंतर्गत सदर शाळेची निवड करण्यात आली व येलो लाईन रस्त्यावर ३ ठिकाणी तंबाखू बद्द्ल घोष वाक्य व भिंतीवर तंबाखू कायद्याच्या २ बोर्ड तयार करून देण्यात आले व सदर शाळा तंबाखू मुक्त घोषित करण्यात आली सदर शाळेला जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती सदस्य व ब्रॅण्ड एम्बेसेडर जिल्हा तंबाखू मुक्त अभियान श्री राज मोहम्मद खान शिकलगर व रावेर तालुका तंबाखू मुक्त शाळा अभियान समनव्यक श्री प्रफुल्ल मानकर सरांनी भेट दिली व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले या वेळी मुख्यध्यपक श्रीमती विद्या रवींद्र चौधरी, शिक्षक समाधान पाटील, शिक्षक पंकज पाटील, शिक्षिका सौ माधुरी विजय चौधरी आशा वर्कर मनीषा पाटील, आशा तायडे उपस्थित होते