रावेर तालुका शिक्षकसेना कार्यकारणी जाहीर :अध्यक्षपदी बाऱ्हे, सरचिटणीसपदी स्वातेश सरोदेची निवड
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा, मंडे टू मंडे वृत्तसेवा : काल रविवार दिनांक ३ रोजी सावदा विश्रामगृह येथे शिक्षक सेनेची बैठक पार पडली यावेळी जिल्हा पातळीवरील पदाधिकऱ्यांचा उपस्थितीत रावेर तालुका शिक्षक सेना कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
रावेर तालुका कार्यकारणी खालीलप्रमाणे घोषीत करण्यात आली-
तालुका अध्यक्ष- पवन बाऱ्हे, ता. सरचिटणीस – स्वातेश सरोदे, ता. कार्याध्यक्ष – हरीश वाणी, ता. कोषाध्यक्ष – युवराज महाजन, तालुका उपाध्यक्ष – राहुल अवसरमल
सहसचिव – अमोल पाटील, महिला प्रतिनिधी – गुंजनताई पाटील, सुनीताताई बेंडाळे, दिपालीताई पाटील, ता. संघटक – मेहराम जाधव, प्रफुल्ल पाटील, निलेश सपकाळे, बापू भोळे, खंडू भिल, साजिद तडवी, चेतन खोंडे आदींचा समावेश आहे.
शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष – नरेंद्र सपकाळे, जिल्हा सरचिटणीस – नाना पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष – संदीप पवार, चोपडा तालुका अध्यक्ष- चंद्रशेखर साळुंखे, यावल तालुका अध्यक्ष- संदीप पाटील, जळगाव तालुका सरचिटणीस – निळूभाऊ चौधरी, जळगाव तालुका कोषाध्यक्ष- अनिल महाजन, धरणगाव तालुका अध्यक्ष- रमेश बोरसे, यावल तालुका सरचिटणीस – अजित तडवी, एरंडोल तालुका अध्यक्ष- सचिन सरकटे, एरंडोल तालुका कोषाध्यक्ष- सतीश महाजन, एरंडोल ता. उपाध्यक्ष- भूषण पाटील इ. ची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नाना पाटील यांनी प्रस्तावना केली तसेच संदीप पवार यांनी संघटनेचे महत्व आणि कार्य याबद्दल मार्गदर्शन केले. मा.हरीश बोंडे, मा.प्रभाकर पाटील, मा.ज्ञानेश्वर पाटील,मा. राजेंद्र वंजारी, मा.नवल चौधरी, मा.गोकूळ भोई यांचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच श्री दत्तात्रय तायडे यांनी यावेळी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमासाठी परिसरातील मुख्याध्यापक , शिक्षक बंधु-भगीनी उपस्थीत होते .