भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नगरपालिकारावेर

सोलर पेनल च्या माध्यमातून सावदा पालिका करणार विजेची बचत; स्तुत्य निर्णय.

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा (प्रतिनिधी)। येथील नगरपालिका लवकरच वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असून पालिकेच्या ईमारतीवर सोलर पेनल बसविण्यात येणार असून याव्दारे संपूर्ण पालिका इमारतित विज मिळणार असल्याने पालिकेचे दरवर्षी येणारे लाखो रूपयांचे विज बिलाची बचत होऊन वीजे बाबत पालिका स्वयंपूर्ण होणार असल्याने या निर्णयानाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे, पालिका सभेत सोलर पेनल बसविणे बाबत ठराव मंजूर झाल्यावर याबाबत निविदा काढण्यात येऊन एका संस्थेस हे काम देण्यात आले असून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून हे काम करण्यात येत आहे लवकरच या कमास सुरवात होणार आहे, पालिकेच्या इमारतीवर हे ग्रिड कनेक्टर सोलर बसविण्यात येणार आहे,

संपूर्ण पालिकेचा असणारा विज पुरवठा या सोलर वरून होईल यामुळे पालिकेची वर्षाकाठी होणारे लाखो रूपयांचे विजबिलाची मात्र बचत होणार आहे, पालिकेस महिन्याकाठी सदर नवीन इमारती चे बिल 12 ते 13 हजार रुपये इतके येत असते याप्रमाणे प्रमाणे वर्षास सुमारे 1 लाख 50 हजार रूपयांचे विज बिल पालिका महावितरण कंपनीस भरते मात्र ही सोलर पेनल यंत्रणा कार्यन्वित झाल्या वर वर्षाकाठी पालिकेची सुमारे दीड लाख रूपयांची विज बिल बचत होणार आहे, व सोलर पेनल बसून स्व:ताची विज निर्मिति करणारी बहुधा सावदा ही जिल्ह्यातील पहिलीच पालिका ठरणार असल्याचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी सांगितले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!