भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी संकलन अभियान सावदा कार्यालयाचे संत महंताचे उपस्थितीत शुभारंभ

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा (प्रतिनिधि)। अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिर उभारण्यात समजतील प्रत्येक व्यक्तिचा हातभार असावा या उद्देशाने संपूर्ण भारतातून यासाठी निधी संकलित करण्यात येत असून याच अभियानाचा भाग म्हणून सावदा येथे देखील दी 13 रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी संकलन अभियान कार्यालयाचे संत महंताचे उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला, याअगोदर येथील बस स्टेण्ड जवळील दुर्गा माता मंदिरा पासून ते कार्यालय असलेल्या इंदिरा गांधी चौका पर्यन्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी साधु संत व नागरिक यात सहभागी झाले होते.

शोभायात्रा कार्यालया जवळ आल्यावर प्रथम शहरातील बबनभाऊ बड़गे व नरसिंगभाऊ पुर्भि यांचे हस्ते या राम निधी संकलन कार्यालयाचे उद्धघाटन करण्यात आले, यावेळी स्वामीनारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री भक्तीकिशोरदासजी, महामंडलेश्वर पुरषोत्तमदासजी महाराज, सुरेशशास्त्री मानेकर बाबा, शास्त्री वासुदेवचरणदासजी, शास्त्री तरुणसागरदासजी, गोविंदशास्त्री, दिपक भगत, अभियान समिति रावेर तालुका अध्यक्ष डॉ विलास पाटील, विश्वहिंदु परिषदेचे जिल्हा संयोजक योगेश बोरोले, आदी संत मंडळी उपस्थित होते
यावेळी बोलतांना शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांनी श्रीराम सर्वांचे प्रतिनिधी, प्रत्येकाचा हातभार राम मंदिरासाठी लागाव म्हणून हे कार्य, सेतु निर्माण साठी खारिचा वाटा तिचा उद्धार झाला मग आपला देखील राम मंदिर साठी खारीचा वाटा असावा म्हणून हे आयोजन आहे राम मंदिरासाठी करोडो रुपये देणारे आहेत पण प्रत्येकाच्या सहभागने हे मंदिर बनावे ही साधु संतांची इच्छा होती, आपली शक्ती चांगल्या कामा साठी वापरा असेही ते पुढे म्हणाले,
सुरेशशास्त्री मानेकर बाबा यांनी देखील राम मंदिर आमचा अधिकार, राम मंदिराचा गोवर्धन सर्वानी मिळून उचलावा म्हणून हे निधी संकलन असल्याचे सांगत, निधी संकलन पेक्षा जन संकलन महत्वाचे आहे असे सांगितले.

महामंडलेश्वर पुरषोत्तमदासजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रामराज्य येणार, रा- म्हणजे राष्ट्र व म – मंदिर राष्ट्राचे मंदिर उभे राहत असून यासाठी आपला सहभाग सढळ हाताने देण्याचे आवाहन यावेळी मंचावरुन बोलताना केले, दरम्यान याच कार्यक्रमात येथील किसान दूध उत्पादक संस्थे तर्फे अकरा हजार रूपयांचा धनादेश समिति कडे स्वाधीन करण्यात आला, स्वामीनारायण गरूरकुल संस्थे तर्फे १ लाख एकविस हजार रुपये, तसेच वसंत विश्वनाथ महाजन तांडलवाडी यांचे तर्फे १ लाख रुपये यावेळी देण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू पाटील सर यांनी तर आभार अँड, कालिदास ठाकुर यांनी मानले, यशस्वीते साठी मंदिर निर्माण निधी संकलन समिति सावदा यांनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!