भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

सावद्यातील नगरसेवक चौधरींच्या अपात्रतेला नगरविकास कडून तात्पुरती स्थगिती

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा (विशेष प्रतिनिधी)। येथील विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी यानी पदाचा दुरुपयोग करून पालिकेचे आर्थिक नुकसान केले ची तक्रार केले प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले होते यावर राजेंद्र चौधरी यांनी नगरविकास मंत्रालया कडे अपील दाखल केले होते, त्या वर नगरविकास वि भागाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे,

येथील नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी २००६ ते २०११ या काळात त्याच्या पत्नी नगराध्यक्ष असताना पदाच दुरुपयोग करीत वाढीव घरपट्टी लागू असताना स्वतःसाठी घरपट्टी कमी करून पालिकेचे आर्थिक नुकसान केले म्हणून त्याच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या कडे नगरसेवक अजय भारंबे यांनी तक्रार दाखल केली होती त्यावर जिल्हाधिकारी यांनी ७ डिसेंबर रोजी त्याचा अर्ज मंजूर करीत राजेंद्र चौधरी याना अपात्र घोषित केले होते ,त्या विरुद्ध राजेंद्र चौधरी यांनी नगरविकास मंत्रालया कडे अपील दाखल केले असता अपत्रतेच्या ७ डिसेंबरच्या आदेश विरुद्ध पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात येत असल्याचे नगरविकास मंत्रालयाचे कक्ष अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे, तसेच उपरोक्त प्रकरणी मा,मंत्री नगरविकास याचे कडून सुनावणीच्या दिनांक व वेळ प्राप्त झाल्यानंतर सुनावणी आयोजित करण्यात येईल असेही आदेशात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!