भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

अखेर गारबर्डी धरणात अडकलेल्या त्या’ नऊ पर्यटकांना वाचवण्यात यश

सावदा ता. रावेर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : येथून जवळच असलेल्या सातपुडा परिसरात गारबर्डी येथील सुकी नदीवरील धरणाच्या पाण्यात अडकून पडलेल्या नऊ पर्यटकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले असून प्रशासनाला बचाव कार्यात यश आले आहे.

गारबर्डी धरण येथे पर्यटनासाठी अडकलेले मुक्ताईनगर येथील नऊ जण होते. यामध्ये अतुल प्रकाश कोळी ( वय २०) विष्णू दिलीप कोलते (वय १७), आकाश रमेश धांडे (२५), जितेंद्र शत्रुघ्न कुंडक (३०), मुकेश श्रीराम धांडे (१९), मनोज रमेश सोनवणे (२८), लखन प्रकाश सोनवणे (२५), पियुष मिलिंद भालेराव (२२), गणेश सिंग पोपट मोरे (२८) या सर्व नऊ पर्यटकांची सुटका करण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे.

रात्री साडेनऊच्या सुमारास प्रयत्नांची शर्थ करून या नऊच्या नऊ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. पाल येथील रहिवासी इमरान शहा रतनशहा, संतोष दरबार राठोड, परिसरातील रतन भंगी पावरा, तारासिंग पावरा, सिद्धार्थ भिल यांनी बचाव कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रशासनातर्फे रावेर यावल लोकसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशनची टीम, वन्यजीव अधिकारी व कर्मचारी आदींचे सहकार्य या बचाव कार्यात लाभले आहे.

तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेतील सुकी नदीवर असलेल्या गारबर्डी धरण अचानक ओव्हरफ्लो झाल्यामुळे येथे पाण्याच्या प्रवाहात नऊ पर्यटक अडकून पडले असून पर्यटकांच्या दोन्ही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असल्याने पाण्याचा प्रवाह जर वाढला तर ते वाहून जाण्याची भिती होती. या अनुषंगाने धुळे येथून एसडीआरएफचे पथक बोलवण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!