रक्ताच्या नात्यातील बक्षीस पत्रास २० हजारा पर्यंत रक्कमेची मागणी….? सावदा दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रताप….!
सावदा (विषेश प्रतिनिधी)। येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री साठी येणाऱ्या ग्राहकां कडून वेगवेगळ्या कुप्त्या शोधून वेगवेगळ्या मार्गाने अव्वाच्या सव्वा रक्कम घेऊन ग्राहकांची पिडवणूक करून अवैध मार्गाने ग्राहकांकडून पैसा उकडला जात असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत आहे.
बक्षीस पत्र करायचे झाले तर, बक्षीस पत्राला १ सप्टेंबर २०२० पासून रक्ताच्या नात्यातील लोकांना रुपये २०० चा स्टॅम्प लागतो व २०० रुपये नोंदणी फी असे ४०० रुपये लागतात, त्याच बरोबर पेजिंग फी लागते आशा कमी रक्कमा लागत असताना, प्रत्यक्षात मात्र, हा दाखला घेऊन या, तो कागद नाही आहे, अशी अनेक प्रकारची कारणे दाखवून सावदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आर्थिक रित्या पिळवणूक करत ग्राहकां कडुन तब्बल २०,०००/- रुपयांपर्यंत रक्कम लाटली जात असल्याची चर्चा ऐकायला मिळते. या बाबत ग्राहकांशी संपर्क साधून चर्चा केली असता, “ काय करणार काही कागद लागत नसताना करणे दाखविली जातात,आम्हाला दस्त तर नोंदवायचाच असतो, आम्ही दूर-दुरून नातेवाईकांना बोलाविले असते,सर्वांचा वेळ जातो,सर्वाना माहिती आहे,की पैसे घेतल्या शिवाय काम होत नाही,म्हणून नाईलाजास्तव जास्तचे पैसे देऊन काम करून घ्यावे लागते ” असे ग्राहकांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर सांगण्यात आले.
हेही वाचा- सावदा दुय्यम निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा कळस; सरकारी फी च्या ” १००” पट रक्कम केली जाते वसुल !
तसेच येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मालमत्तेचे मूल्यांकन करताना वा खरेदी करताना घसारा दिला जात नाही , घर-जागा ,शेती किंवा इतर सर्व मालमत्तांचे मूल्यांकन साहेबांच्या खास पंन्टरा व्यतिरिक्त इतरांना जास्त काढून दिले जाते व त्यांच्या खास माणसां द्वारा काम केले तर मूल्यांकन कमी करून दिले जाते वा घसारा दिला जातो ,या मध्ये मोठा आर्थिक व्यवहार करून ग्राहकांची आर्थिक लूट केली जाते, असेही बोलले जाते …. तूर्त एव्हढेच…! ………( भाग – ४ )
हेही वाचा- सावदा दुय्यम निबंधक कार्यालयात अडवणूक, ग्राहकांची आर्थिक लुट,,,,,,,,,,!