संध्याकाळ पर्यंत वीज तोडणी बंद न झाल्यास आंदोलन,रावेर शिवसेनेचा इशारा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। आज रावेर शिवसेना तालुकाप्रमुख श्री योगीराज पाटील यांच्या नेतृत्वात रावेर तालुक्यातील शिवसैनिकांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता पाटील यांना निवेदन देण्यात आले.
मागील महीन्यात वारा व पाऊस यामुळे शेतकरी यांचे हाताशी येणारे पीक कपाशी ,मका ,ज्वारी ,सोयाबीन , उडीद मुग व केळी पाण्यामुळे सडून प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हा अत्यंत भीषण परिस्थितीत असून यांनी लावलेला खर्चही निघणे मुश्कील असताना त्यात महावितरण कर्मचारी व अधिकारी यांनी धडक मोहीम राबवत शेती वीजपंप बिले न भरल्यास वीज तोडणी सुरू केली तसेच रोहित्र जळाल्यास आधी बिल भरा नंतर नवीन रोहीत्र लावु अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सक्त सूचना असल्यामुळे त्यांना कारवाई करणे गरजेचे झाले व ते करीत आहे त्या अनुषंगाने शिवसेना रावेर तालुका च्या वतीने कार्यकारी अभियंता रावेर यांना निवेदन देण्यात आले आज संध्याकाळ पर्यंत वीज तोडणी बंद न झाल्यास 29 तारखेला उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला याप्रसंगी जेष्ठ शिवसैनिक सुरेश शिंदे शिवसेना पदाधिकारी नितीन महाजन रावेर शहर प्रमुख प्रवीण पंडित ,युवा सेना तालुका अध्यक्ष वसीम खान , राकेश घोरपडे , संतोष महाजन , राम शिंदे ,कुणाल बागरे ,देवेंद्र बागरे,समाधान महाजन ,निलेश महाजन मुकेश पाटील बरेच शिवसैनिक उपस्थीत होते