भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर ग्रामीण रूग्णालयातील सिस्टर चा रूग्ण महिलेवर उपचार करण्यास नकार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। खिर्डी येथील भिमराव कोचुरे हे खाजगी कामानिमित्त रावेर येथे गेले होते. दीड ते दोन वाजेच्या सुमारास अचानक त्याच्या पत्नीला थंडी वाजून ताप आला हि लक्षणे जाणवू लागल्याने ग्रामीण रुग्णालय जवळ असल्याने त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी गेलो असता तिथे ड्युटीवर कार्यरत असलेल्या सिस्टर ने सांगितले ओपिडी फक्त बारा वाजेपर्यंत सुरू राहते ओपीडी बंद झाल्यानंतर येणाऱ्या रुग्णावर उपचार करता येत नाही तुम्ही उद्या या असे म्हणत उपचार करण्यास नकार देण्यात आला. आजाराची लक्षणे केव्हा जाणवतील.याची शक्यता नाही किंवा ऐनवेळी कोण आजारी पडील याची शाश्वती नाही.ज्या वेळेस कुणाला काही त्रास होवू लागल्यास ती व्यक्ती आपल्या रुग्णालयात औषधीउपचार घेण्यास कोणत्याही क्षणी येवू शकते याची गॅरंटी नाही. १२ वाजे नंतर उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णास उपचार करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मनाई करण्यात आली आहे का? फक्त १२ वाजे पर्यंत येणाऱ्या रुग्णावरच उपचार केले जातात का? याची काही नियमावली आहे का ? असेल तर ती प्रसिध्द करण्यात यावी.याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून सदर सिस्टर वर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे भिमराव कोचुरे यांनी मंडे टू मंडे न्यूज शी बोलताना सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!