Raver : शौचालय घोटाळा प्रकरणात पुन्हा सहा संशयित ताब्यात !
रावेर,मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : रावेर पंचायत समिती शौचालय घोटाळा जिल्ह्यात गाजत असून प्रकरणात पुन्हा संशयितांना अटक सत्र सुरू करण्यात आली असून नव्याने सहा जणांना संशयित म्हणून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यात संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता दाट आहे.
- यावल तालुक्यातील तरुणाची विषारी द्रव घेऊन आत्महत्या
- सततची नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
- बलवाडी – खिर्डी रस्त्यामुळे व वाढलेल्या झुडपांमुळे अपघाताचा धोका
रावेर पोलीस ठाण्यात रावेर पंचायत समितीच्या शौचालय भ्रष्टाचार प्रकरणात दाखल गुन्हात पुन्हा अटकसत्र सुरू झाले असून आरबाज फिरोज खान (वय २१) लुमखेडा, कामिल जमील खान (वय ३५) लुमखेडा, फिरोज जमील खान (वय ४०) लूमखेडा, शेख आरीफ शेख रईस (वय २९) उदळी, आदम जहानखा तडवी (वय ३७) कुसुंबा खु, रमेश सुभान तडवी (वय ४०) कुसुंबा खु. अश्या सहा जणांना नव्याने सहा आरोपींना या प्रकरणात तालुक्यातील कुसुंबा लुमखेडा आणि उदळी गावातून ताब्यात घेतले आहे.
याआधी याप्रकरणात १८ आरोपी पोलीसांच्या ताब्यात होते त्यामुळे आता संशयित आरोपींची संख्या २४ वर पोहचली आहे. आज चौकशीअंती त्यांना अटक करण्यात येणार असून याप्रकरणाचा तपास शितलकुमार नाईक करत आहेत.